+918048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

अस्थिभंग व प्लास्टर प्लास्टर हे पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवले जाते. एकविसावे शतक असले तरी प्लास्टर पासून अजून तरी काही सुटका मिळालेली नाही. परदेशात सुद्धा प्लास्टर विरहित अस्थिरोग उपचार ऐकावयास मिळालेले नाही. प्लास्टर बद्दल रुग्णांच्या मनात विविध प्रकारच्या भीती असते रुग्णांना असं वाटते त्यांना चालता येणार नाही , त्यांच्या दैनंदिन क्रिया त्यांना करता येणार नाही, त्यांच्या रुग्णांच्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा येतील अशा प्रकारच्या कल्पनेनेच रुग्ण पायाचे प्लास्टर करण्यास नकार देतात. हाताच्या प्लास्टरच्या बाबतीत सुद्धा हेच ऐकावयास मिळते. मात्र रुग्ण नाईलाजाने प्लास्टर करण्यास तयार होतात. डॉक्टरांनी प्लास्टर करण्याचा सल्ला दिला तर त्यांनी या सर्व अडचणींची जाणीव असते पण प्लास्टर चढवणे हे अधिक महत्त्वाचे असते कारण असे ना केल्यास पुढे होणाऱ्या त्रासाची डॉक्टरांना कल्पना असते. प्लास्टर केले नाही तर रुग्णांना पुढील त्रास होऊ शकतात. हाड न जोडणे, फोड येणे , सूज येणे, खूप काळ तो भाग दुखत राहणे, लचक भरलेले पाय वारंवार लचकणे व तोल जाऊन पुन्हा जास्त इजा होणे साधे हार्ड टिचले असेल व प्लास्टर केले तरी कालांतराने ते जोडून येते. जर प्लास्टर करणे टाळले तर दिसलेल्या हाडांचे अंतर वाढते किंवा त्याचे अधिक तुकडे होऊन ते सरकते व साधे अस्थिभंग अवघड होते सध्या प्लास्टर उपचाराच्या ऐवजी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते त्यामुळे योग्य वेळी उपचार केला तर तेवढा काळ अडचणीत जातो पण नंतर कमी कालावधीत रुग्ण बरा होतो. प्लास्टर कधी केले जाते? अस्थिभंग झाला असेल नुसते दिसले असेल तर फक्त प्लास्टर करतात. मात्र वाक असलेल्या किंवा सरकलेल्या असल्यास भूल देऊन सुधारित प्लास्टर केले जाते. मुका मार लागून सूज आली असेल तर अस्थिबंधांना इजा झाली असेल तर सांध्यात मार लागला असेल तर काही वेळा शस्त्रक्रियेनंतर याचे फायदे जास्त असतात शस्त्रक्रियेनंतर त्या भागावर ची सूज कमी होते. शस्त्रक्रिये नंतर होणाऱ्या वेदना कमी होतात विशिष्ट स्थितीत प्लास्टर केल्यानंतर पुढच्या बोटांची हालचाल व्यायाम करणे सोपे होते. व्यंगाच्या दुरुस्तीसाठी काही वेळा प्लास्टर करणे सोपे जाते. जन्मतः पाय वाकडे दर महिन्याला थोडे थोडे करता बऱ्याच बाळांचे सी टी इ व्ही प्लास्टरने पाय पूर्ण सरळ झाले आहेत. पोलिओचे बाक रुग्णांचे वाकडे पाय व हात सरळ करून ते सुधारित स्थितीत ठेवून ते सरळ केले जातात अन्यथा पुन्हा पूर्वीसारखे व्यंग तयार होते. काही दिवस महिने प्लास्टरमध्ये पाय सरळ ठेवल्यानंतर पुढे कॅलिपर दिले जातील त्याने पाय सरळ राहण्यास मदत होते. शिवाय रुग्णास चालण्यासही मदत होते .वातामुळे सांध्यात वाकडे झालेले पाय व हात देखील प्लास्टरने सरळ करता येतात प्लास्टर लावल्यानंतर बाक आलेल्या भागात फक्त प्लास्टर कापले जाते .व दाब देऊन किंवा ताण देऊन सुधारित स्थिती प्लास्टरच्या साह्याने टिकवली जाते काही दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर पुन्हा तसेच प्लास्टर बाग असलेल्या ठिकाणी कापून अजून चांगल्या स्थितीत आणला जातो असे करता करता पायाचे व्यंग पूर्ण दुरुस्त करून सरळ झाल्यावर अवयव काही आठवडे ठेवून सांध्यांचा व्यंग बरा केला जातो .या पद्धतीने उपचार आज सिरीयल प्लास्टर कास्ट वेजिंग असे म्हणतात नंतर सांध्याच्या हालचाली होण्यासाठी व्यायाम करून घेणे महत्त्वाचे असते.