+918048036466
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

डॉक्टर डे निमित्त एमएससीबी युनियन सदस्य श्री. संजय उगले यांच्याकडून डॉ. गिरीश औताडे व अश्विनी अॅक्सिडेंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सन्मान नाशिक : राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त अश्विनी अॅक्सिडेंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कृतज्ञतेचा एक भावपूर्ण उपक्रम पार पडला. एमएससीबी युनियनचे सदस्य (सभासद) श्री. संजय उगले यांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉ. गिरीश औताडे, तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. श्री. संजय उगले हे अश्विनी अॅक्सिडेंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे रुग्ण असून, उपचारादरम्यान त्यांना मिळालेली उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, वेळेवर उपचार आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आत्मीय सहकार्य याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना श्री. उगले म्हणाले, 'डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी हे रुग्णांसाठी देवदूतासारखे कार्य करतात. दिवस-रात्र निःस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या या सर्वांचा सन्मान करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. डॉक्टर डेच्या निमित्ताने त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा करण्याची ही एक छोटीशी संधी आहे.' डॉ. गिरीश औताडे यांनी श्री. उगले यांचे आभार मानत सांगितले की, 'रुग्णांकडून मिळणारे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच आमच्या सेवेला मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा आहे. अशा सन्मानामुळे संपूर्ण आरोग्यसेवा टीमला अधिक समर्पितपणे रुग्णसेवा करण्याची प्रेरणा मिळते.' याप्रसंगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर डेच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमामुळे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वास, स्नेह आणि कृतज्ञतेचे नाते अधिक दृढ झाल्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. अश्विनी अॅक्सिडेंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, अपघात उपचार (Trauma Care), अस्थिरोग, प्लास्टिक सर्जरी आणि रुग्णकेंद्रित सेवा उपलब्ध असून, रुग्णांच्या विश्वासाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.