+918048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
Care After Hip Replacement Surgery Hip replacement is a major surgery, so taking proper care after the operation is very important. It helps speed up recovery and prevents complications. 1. Movement & Physiotherapy Start movements exactly as advised by your doctor or physiotherapist. Use proper support (walker, stick) while sitting, standing, or walking. Do not cross your legs or bend excessively. Regular physiotherapy exercises help strengthen the hip faster. 2. Sitting & Sleeping The chair should be firm and high; avoid sitting very low. While sitting, keep knees lower than the hips. While sleeping, place a pillow between the legs to prevent them from crossing. 3. Wound Care Get stitches/staples removed on time. Keep the wound clean and dry. If swelling, redness, or fever occurs, inform the doctor immediately. 4. Medications Take painkillers and antibiotics as prescribed by the doctor. If blood-thinning medicines are prescribed, do not skip doses. 5. Other Important Instructions Use anti-slip mats and handrails in the bathroom. Avoid climbing stairs for the first few months; use support if necessary. Maintain healthy weight – excess weight puts stress on the hip. Avoid driving until the doctor allows it. हिप रिप्लेसमेंट झाल्यानंतर रुग्णाने घ्यायची काळजी हिप रिप्लेसमेंट ही मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळे ऑपरेशननंतर योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे बरे होण्याचा वेग वाढतो आणि गुंतागुंत टाळता येते. १. हालचाल व फिजिओथेरपी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट सांगतील त्या प्रमाणेच हालचाल सुरू करावी. बसताना, उठताना व चालताना योग्य आधार (walker, stick) वापरावा. पाय क्रॉस करू नये किंवा अति वाकू नये. नियमित फिजिओथेरपीचे व्यायाम केल्याने हिप लवकर मजबूत होतो. २. बसणे व झोपणे खुर्ची उंच व कडक असावी; खूप खाली बसू नये. बसताना गुडघे कंबरपेक्षा खाली ठेवावेत. झोपताना पायामध्ये उशी ठेवावी जेणेकरून पाय एकमेकांवर येणार नाहीत. ३. जखमेची काळजी टाके / स्टेपल्स वेळेवर काढून घ्यावेत. जखम स्वच्छ व कोरडी ठेवावी. सूज, लालसरपणा, ताप आल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे. ४. औषधं डॉक्टरांनी सांगितलेली वेदनाशामक आणि इन्फेक्शन टाळण्यासाठीची औषधं वेळेवर घ्यावीत. रक्त पातळ करणारी औषधं दिल्यास त्यांचे डोस चुकवू नयेत. ५. इतर महत्त्वाच्या सूचना बाथरूममध्ये अँटी-स्लिप मॅट, हँडल्स वापरावेत. पहिल्या काही महिन्यांत जिने चढणे-उतरणे टाळावे, गरज असल्यास आधार घ्यावा. लठ्ठपणा टाळावा – जास्त वजनामुळे हिपवर ताण येतो. वाहन चालवणे डॉक्टर परवानगी देईपर्यंत टाळावे. साधारणतः ६-८ आठवड्यांनंतर रुग्ण हळूहळू दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करू शकतो.