+918048036466
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

प्रश्न: पाठदुखी कायमस्वरूपी असते आणि ती नेहमी स्लिप डिस्कमुळेच होते का? ✅ उत्तर: नाही. प्रत्येक पाठदुखी कायमस्वरूपी नसते आणि पाटदुखी फक्त स्लिप डिस्क मुळे नसते. तसेच, स्लिप डिस्कमुळे होणारी पाठदुखीही योग्य उपचारांनी बरी होऊ शकते. पाठदुखीची इतर कारणे: - स्नायू किंवा लिगामेंटला जास्त ताण आल्यामुळे होणारी दुखापत (Back Strain) - चुकीची बसण्याची किंवा उभे राहण्याची सवय - स्पॉन्डिलायटिस (Spondylitis) - बर्सायटिस (Bursitis) - तसेच इतर अनेक कारणांमुळेही पाठदुखी होऊ शकते. प्रश्न: प्रत्येक स्लिप डिस्कच्या रुग्णाला शस्त्रक्रिया करावी लागते का? ✅ उत्तर: नाही. प्रत्येक स्लिप डिस्कसाठी शस्त्रक्रियेची गरज नसते. आमच्याकडे असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना वीसाव्या वर्षी स्लिप डिस्कचा त्रास झाला होता. आज ते साठ वर्षांहून अधिक वयाचे असून शस्त्रक्रिया न करताही ते वेदनामुक्त आणि नियमित जीवन जगत आहेत. प्रश्न: स्पाइन शस्त्रक्रियेनंतर कायमचे अपंगत्व येते किंवा काम करता येत नाही का? ✅ उत्तर: नाही. आजच्या आधुनिक काळात स्पाइन शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह (Minimal Invasive) पद्धतीने केली जाते. स्पाइन शस्त्रक्रियेनंतर आमचे अनेक रुग्ण कारखान्यांमध्ये काम करत आहेत, शेतीची कामे करत आहेत तसेच विविध खेळांमध्येही सक्रियपणे सहभागी होत आहेत. प्रश्न: स्पाइन शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर मांडी घालून बसता येते का? तसेच दोन्ही पायांवर बस्ता येते का? उत्तर: होय. मात्र यासाठी योग्य वेळ आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या ६ महिन्यांमध्ये जमिनीवर मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे आणि मणक्यावर जास्त ताण येईल अशा हालचाली टाळाव्यात. या काळात मणक्याला योग्य प्रकारे बरे होण्यासाठी वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे असते. ६ महिन्यांनंतर, डॉक्टरांच्या तपासणीत सर्व काही व्यवस्थित असल्यास, बहुतेक रुग्ण मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे तसेच दैनंदिन कामे पूर्ववत करू शकतात. 💡 सल्ला: प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजाराचे स्वरूप आणि शस्त्रक्रियेचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे कोणतीही हालचाल किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या स्पाइन सर्जनचा सल्ला अवश्य घ्या. योग्य निदान, वेळेवर उपचार आणि अनुभवी स्पाइन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे मणक्याचे बहुतेक आजार यशस्वीपणे बरे होऊ शकतात.