
व्यवसायामुळे होणारी पाठ्दुखी (वर्किंग बॅकेक)
हल्ली बरेच जणांना पाठदुखी होते. आपल्याला कधीतरी मार लागला असावा, लहानपणी आपण पडलो असू त्यामुळे असे दुखणे सुरु झाले असेल,असा विचार करुन आपण फॅमिली डॉक्टरांकडून औषध घेतो व तात्पुरतेदुखणे कमी करतो. कधी दुखणे थांबते तर कधी रेंगाळते किंवा वाढते. बरेच जण असेही असतात ज्यांचे धकाधकीचे जीवन नसते. रोज ९ ते ५ ऑफिस वर्क असते. मग एखादा मित्र त्यांची चेष्टा करतो आणि म्हणतो, ''तुला रे कसली पाठदुखी आली, तुला काही बोजे उचलायला लागत नाही, ऑफिसमध्ये टेबल-खुर्ची वर बसणे, स्कुटर बस, गाडी याने ऑफिसात जाणे एवढे आरामात आयुष्य आहे तु काय पाठदुखीचे नाटक करतो.'
पण जेव्हा पाठदुखी असह्य होते तेव्हा मात्र कळुन चुकते की हे नाटक नाही ही सत्य परिस्थिती आहे. याच वाक्याचा वेध घेत विचार करु की ही पाठदुखी कशामुळे होते. पाठदुखीची तशी अनेक कारणे आहेत. त्यापैकी ईजा न होता म्हणजे ऑफिस काम करणाऱ्या व्यक्तींना (सडेंट्री वर्क) पाठटदुखी कशी उद्भवते याची आपण माहिती घेऊ.
प्राणीमात्रांमध्ये पाठदुखी अशी समस्या उद्भवत नाही. मानवाने ज्यावेळेस दोन पायावर उभे राहण्यास सुरुवात केली त्यावेळेपासुन ही समस्या दिसू लागली आणि आता हिचे प्रमाण खुप वाढले गेले.प्राण्यांमध्ये शरीराचा भाग हा चारही पायांवर विभागला जातो त्यामुळे मणक््यांवर त्याचा भार येत नाही आणि पाठदुखी होत नाही. मानवामध्ये वरच्या शरीराचा भार जास्त मणक्यावर येतो आणि थोडाफार खुब्याच्या सांध्याच्या स्नायु आणि थोडा पाठीच्या आणि पोटाच्या स्नायुंद्वारे विभागला जातो.
हल्ली मणक््यांवर अनेक कारणांमुळे भार आणि ताण वाढलेला आहे. हल्लीच्या 'दगदगीच्या जीवनात निरनिराळ्या कारणाने बसणारे झटके, दणके व त्यामुळे मणक््यांवर कमी जास्त प्रमाणात प्रत्येक वेळेस ताण पडत असतो व कधी छोट्या स्वरुपाच्या इजा (इंज्युरी) देखील होत असतात. तसेच सुरुवातीच्या मानव जमातीला ही समस्या कमी प्रमाणात होती. कारण पोटाचे आणि पाठीचे स्नायु अगदीच सक्षम होते व मणक्यांवर येणारे दणके किंवा झटके, स्नायु शॉक अँबसॉन्बच्या कार्याप्रमाणे अगदीच हलके करुन टाकत होते तसेच शारिरीक श्रम करणारी व्यक्ती असे आणि त्या व्यक्तीचेही पाठीचे स्नायु सक्षम असतील तर तिला पाठदुखी होत नाही.
मणक्यांवर बसणारे दणके व ताण वाढवणारी कारणे :-
गतीशील गाड्या, अर्जंट ब्रेक, स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील खड्डे, स्थुलता, हाय हील्सचा वापर, ब्रेकडांस अशी अनेक कारणे आहेत.
पाठदुखीचे दुसरे कारण म्हणजे चुकीच्या सवयीमुळे होणारी पाठदुखी चुकीच्या बसण्या-उठण्याच्या,
झोपण्याच्या सवयी यामुळे होणाऱ्या पाठदुखीला पोस्चरल बॅकेक म्हणतात.तसेच चुकीच्या काम करणाऱ्या पद्धती किंवा सवयी यामुळे पण पाठदुखी होते याला फॉल्टी वर्किंग हॅबिट्स मुळे होणारी पाठदुखी म्हणतात.
मणक्यांची रचना :-
पाठदुखी समजून घेण्यासाठी मणज्याच्या रचनेबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे. मणके एकावर एक असे अनेक रचलेले असतात. व्हरटिबल कॉलम (पाठीचा कणा) मणका हा इमारतीच्या कॉलमप्रमाणे सरळ नसतो ह्या कॉलम S आकार प्रमाणे वाक असतो. हा वाक कमरेच्या भागात पुढे गोलाई(कर्वेचर) असते. तर पाठीच्या वरच्या भागात मागे गोलाई असते.
बसताना, उभे राहताना तसेच झोपताना जर ह्या नैसर्गिक ठेवणीच्या अनुसार वागलो तर पाठदुखी होत नाही.त्याचप्रमाणे काम करताना देखीळ ह्या नैसर्गिक रचनेनुसार कामे केत तर पाठदुखी होण्याची संभावना कमी असते.
प्रवास आणि पाठदुखी :
कामावर येणाऱ्या व्यक्तिंनी प्रवा पाच्या वेळेस काळजी घेतली तर ह्या समस्येला तोंड लागणार नाही.
दुचाकी वाहकांनी कोणती काळजी घ्यावी ?
स्कुटरवर किंवा अन्य दुचाकी वाहनावर बसताना ताठ बसणे, जास्त कुबड काढुन न बसणे. स्पीड ब्रेकर, खड्ड्यांमध्ये वेग अगदी कमी करावा. दुचाकी वाहन लावताना ओढाताण किंवा झटका बसणार नाही याबाबतची दक्षता घेणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असल्यास स्टँडचे ऑइलींग/ग्रीसींग, तसेच् शॉक ऑबसॉर्बच्या बाबतीत व टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
चारचाकी वाहन चालकांसंदर्भात मुद्दे –
चारचाकी वाहन चालकांसाठी सीटला पाठ टेकवणे असल्यास सीट बेल्ट लावणे उपयुक्त ठरते. याशिवाय सीट पुढे –मागे करुन योग्य अंतर ठेवल्यास किंवा पाय आखडुन बसल्यास कमरेवर येणारा ताण कमी होतो.
पुर्वीच्या सिंगल सिट्सपेक्षा हल्ली असणारे बकेट सिट आणि त्यात करणाऱ्या अॅडजेस्टमेंटमुळे आपल्या शरीररचनेप्रमाणे अॅडजेस्टमेंट "करण्याची सुद्धा आता ह्या वाहनांमध्ये सोय असते. लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळेस कमरेच्या भागात एखादी बारीक उशी ठेवल्याने कमरेला चांगला आराम मिळतो. तसेच मानेला C आकाराची उशी किंवा नेकपिलो वापरल्याने डुलकी लागल्याने मानेला झटके बसत नाहीत.
पोसचर आणि पाठदुखी -
नार्मल पोस्चर म्हणजे मणक्यांचा नैसर्गिक ठेवणीच्या अनुसार उठण्या, बसण्याच्या तसेच झोपण्याच्या योग्य पद्धती. त्यानुसार आपले वर्तन असले तर पाठदुखी होत नाही. पण नैसर्गिक रचनेच्या विरुद्ध व चुकीचे आपण आपले उठण्या-बसण्याचे कार्य केले तर पाठदुखी होऊ शकते आणि ही पाठदुखी उठण्या- बसण्याच्या सवयी माहिती नसल्याने होत असते. उभे राहण्याच्या सवयी बाबत बघितले तर उभे राहताना विश्राम म्हणजे दोन्ही पायांच्या मध्ये १ ते १.५ फूट गॅप ठेऊन उभे राहिले तर दोन्ही पायांच्या खुब्यांवर मणक्याचा लोड डिस्ट्रिब्युट केला जातो.आणि जर दोन्ही पाय जवळ ठेऊन उभे राहिलो ,तर बराचसा भार मणक्यांवरच येतो.जर जास्त वेळ उभे राहण्याची वेळ आली तर पायात अंतर ठेऊन उभे राहणे . अन्यथा अधून मधून बसून घेणे
बसण्याच्या सवयी / पोसचर :
आपण पोक काढुन, कुबड काढून बसलेलो असतो. त्यामुळे पाठीच्या मणक्यांवर ताण पडतो. कारण मणक्यांचे नॉर्मल पोसचर (नैसर्गिक रचना)च्याविरुद्ध आपण बसतो आणि त्यामुळे मणक्यांच्या खालच्या भागात (कमरेत)खुप ताण पडतो. बसताना आपण व्यवस्थित पाठ टेकुन बसावे. खांदे मागच्या बाजुस टेकलेले असावे. खुर्चीला जर हात असतील तर आपले हात खुर्चीवर टेकवावे कारण आपल्या शरीराचा बराचसा भार त्या हातावाटे विभागला जातो. असे केल्याने मणक््यांना असलेला व्हर्टीकल लोड बराचसा कमी करुन आपण पाठदुखीपासुन सुरक्षित राहतो.
टेबल खुर्ची संदर्भात मुद्दे -
बरेच जणांचे म्हणणे असते की बसण्यासाठी खुर्ची कोणत्या स्वरुपाची वापरायची ?
-ऑर्थोपेडिकली डिजाईन्ड खुर्ची वापरावी, कारण पुर्वीच्या लाकडी खुर्च्या सरळ होत्या. अशा खुर्च्यांमध्ये पाठीचा
म्हणजे नैसर्गिक वाक आहे त्यास आधार मिळत नाही आणि त्यामुळे कमरेवर ताण पडतो.
पायांच्या त्यामुळे आजकालच्या खुर्च्यांना मागच्या बाजूस तेसा वाक दिलेला आहे. त्यामुळे पाठीला खालच्या बाजुस आधार मिळतो परंतु जर आपणाकडे अशी खुर्ची नसेल तर मग मागे उशी घ्यावी म्हणजे ती पाठीला
खालच्या बाजुस बरोबर आधार देईल आणि पाठही खुर्चीला पुर्णपणे टेकलेली राहील. त्याशिवाय खुर्चीला योग्य उंची असावी कारण खुर्ची जर कमी उंच असेल तर पाय गोळा करुन बसावे लागते आणि त्यामुळे पाठीला जो वाक येतो तो नैसर्गिक वाकाच्या अगदी विरुद्ध बाजूस असतो. तसेच खुर्ची जर खुप उंच असेल तर पाय जमिनीला टेकत नाही आणि पायाचे चवडेच जमिनीस टेकतात आणि त्यामुळेही पाठीच्या मणक्यांवर ताण पडतो. तसेच आजकाल अॅडजेस्टेबल खुर्ची मिळते म्हणजे उंचीनुसार वर-खाली करता येऊ शकते अशा प्रकारे आपण पाठीवर पडणारा ताण कमी करु शकतो. तसेच जर खुर्चीला कॉस्टर (चाके) असतील तर ती खुर्ची टेबलाच्या अगदी जवळ घेऊन आपण लिहू शकतो.
लिखाणासंदर्भात मुदे :-
लिहिताना हनुवटी व मान खाली करुन लिहीत असतो आणि जर आपण तसे लिहीत असलो तर ते मणक्यांच्या नैसर्गिक रचनेच्या विरुद्ध असते कारण नैसर्गिक रचनेप्रमाणे मानेचा वाक हा मागील बाजुस असतो. परंतु हनुवटी खाली केल्याने तो समोरच्या बाजुस जातो आणि त्यामुळे मानेच्या मणक्यांना ताण येतो. असे जर जास्त वेळ झाले तर मणक््यांची झीज होते.पुर्वीच्या काळी मुनीमजींना लिहीण्यास डेस्क असायचे. त्याला स्लोप असायचा त्यावर लिखाणाचे साहित्य ठेऊन लिहीले जायचे आणि डेस्क जर स्लोपिंग नसतील,सरळ असतील तर स्लोपिंगया डेस्क बनवुन घेतला पाहिजे आणि जर अशाने सरळ टेबलावर खुप काळ लिहिले तर सरवायकल स्पाँडिलॉसिस होते अशांना मानदुखीचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थी बसताना तिरठे, बसतात किंवा वाकून लिहितात, यामुळे मन व पाठ दुखते. विद्यार्थ्यांनी बसताना सरळ बसणे,डेस्कची उंची कमी असली तर वहीखाली अजून पुस्तके किंवा पॅड घेऊन योग्य ऊंची करुन लिहिणे. ज्या वहीत लिहायचे आहे ती सरळ असावी. त्यामुळे पाठ, हनुवटी सरळ राहते.
कॉम्प्युटर संदर्भात मुदे:
कॉम्प्युटरच्या बाबतीत असे लक्षात येते की कॉम्प्युटर आय लेव्हल जर नीट अँडजेस्ट केला नसेल तर आपणान कॉम्प्युटर वाकुन ऑप्रेट करावा लागतो. कि-बोर्डखाली असल्याकारणाने वेळोवेळी आपणास खाली-वर बघावे लागते आणि एखादी ओळ शोधण्याकरिता मानेला वारंवार वाकवावे लागते. त्यामुळेही पाठील्या आणि मानेला त्रास होतो. परंतु आता आधुनिक कॉम्प्युटर वापरात आले आहे.ज्यामध्ये आय लेव्हल अँडजेस्ट केलेली असते आणि त्यामुळे आपणास कि-बोर्उ आणि कॉम्प्युटर एकाच फिल्ड मध्ये बघून ऑप्रेट करता येऊ शकतो.ज्यामुळे मान सारखी सारखी खाली-वर करणे टाळता येऊ शकते.असे अजुन अनेक दैनंदिन जीवनामधल्या हालचालींमुळे पाठदुखी आपल्या कळत-नकळत उद्भवण्याची संभावना असते आणि आपण पाहिल्याप्रमाणे जर योग्य सवयी आणि नियम पाळले तर पाठदुखी होणार नाही .जर आपल्या पैकी कोणालाही अशी -रेंगाळलेली पाठदुखी (क्रॉनीक बॅकेक)असल्यास अस्थिरोग तज्ञांकडून तपासणी करुन (फिजीकल चेकअप) आवश्यक असल्यास रक्त, लघवी, एक्स रे व इतर तपासण्या करुन नेमकी पाठदुखी कशामुळे आहे याचा खुलासा करुन घेणे. नियमीत व्यायाम असल्यास पाठीचे व पोटाचे स्नायु सक्षम राहतात व पाठदुखीपासुन संरक्षण करतात. पण पाठदुखी उद्भवल्यानंतर तज्ञांच्या सल्ल्याशिवाय एखाद्या वेळेसस्वत:च्या मनाने चुकीचा व्यायाम करण्याच्या पद्धतीमुळे पाठदुखी वाढण्याची शक्यता असते. अशा वेळेस तज्ञांच्याच सल्ल्यानुसार पाठदुखीवर ,उपचारांसाठी व्यायाम करणे उपयुक्त असते.
मणक्यांच्या शस्त्रक्रियेसंदर्भात :
८० ते ९० टके पाठदुखीचे रुग्ण औषधोपचार, व्यायाम, फिजीओथेरपी,
ट्रॅकशन, निरनिराळ्या प्रकारचे शेक आय.एफ.टी. अल्ट्रासोनिक थेरपी, इत्यादीविना शस्त्रक्रियेद्वारा पाठदुखीच्या उपचारपद्धतीनेच (नॉनसर्जिकल ट्रिटमेंट,ऑफ बॅक) बरे होतात.
ह्या सर्व प्रकारचे उपचार केल्यानंतर प्रमाणाबाहेर पाठदुखी असेल तर शस्त्रक्रिया सांगीतली जाते. पूर्वीपेक्षा आता शस्त्रक्रिया किंवा मणक्यांची शस्त्रक्रियेचे शल्य (टेकनीक) बरेच सुधारले आहे. त्यामुळे कमी टाक्यांची शस्त्रक्रिया करता येते.(मिनीमल ईनव्हेझिव सर्जरी ऑफ बॅक) व शस्त्रक्रियेनंतर रुग्ण समाधानी असल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेबद्दल जास्त धास्ती बाळगू नये.
-डॉ.गिरीश औताडे.(अस्थिरोग तज्ज्ञ)
०२५३-२४७२५५२/२४७२५५३
०८०४८०४००२१
